Vadgaon News : पवन मावळ पूर्व विभाग राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्षपदी ज्योतिबा आयारे

एमपीसीन्यूज : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,ओबीसी सेल पवन मावळ पूर्व विभाग अध्यक्षपदी ज्योतिबा रतन आयारे यांची निवड करण्यात आली.

माजी मंत्री मदन बाफना यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रभारी व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अतुल राऊत, मावळ प्रभारी मंगेश खैरे, मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे आदींच्या उपस्थितीत आयारे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी माजी सरपंच राजेश वाघोले, वडगाव शहर ओबीसी सेल अध्यक्ष मयुर गुरव, किरण वाघोले, विकी ढोरे, संकेत सोरटे, अभिजीत मोगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.