Vadgaon News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त आनंद भोईटे यांची वडगाव येथील एल अँण्ड टी कंपनीला भेट 

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील एल अ‍ॅण्ड टी (लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो) कंपनीच्या परिसरात उभारलेल्या डॉ. मियावाकी टेक्निकल प्रकल्पाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त आनंद भोईटे यांनी शुक्रवारी (दि.५) भेट देऊन असे प्रकल्प राबविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, वनपाल ज्ञानदेव ढेंबरे, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, वनरक्षक काळूराम कड, पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड, रमेश पवार, दीपक जायगुडे, मिलिंद कुलकर्णी, पोलीस पाटील भानुदास दरेकर आदी उपस्थित होते.

उपायुक्त भोईटे पुढे म्हणाले सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेल्या मावळ तालुक्यात वने व वन्यजीव मोठया प्रमाणावर वास्तव्यास आहे. निसर्ग सौंदर्य वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या जागेत असे डॉ. मियावाकी टेक्निकल प्रकल्प उभारावे. यामुळे हवा प्रदूषण रोखण्यास मदत होईल.

वने व वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सामाजिक संस्थांनी देशी वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील वऱ्हाड (लिझिंगा) टेकडी वर देशी वृक्षांचे रोपण करावे. या ठिकाणी असलेल्या शिवकालीन वस्तूचे जतन करावे.

माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी नवलाख उंब्रे ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.