Vadgaon News : ग्रामीण रुग्णांना कान्हे येथील कोरोना आरोग्य केंद्रात उपचारांची सुविधा मिळणार : आमदार सुनील शेळके

कान्हे येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्राचे आमदार शेळके यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसीन्यूज – मावळच्या ग्रामीण भागातील कोरोना सदृश रुग्णांना कोरोना संबधित सर्व उपचार कान्हे येथील कोरोना समर्पित आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार आहेत. तसेच याठिकाणी व्हेन्टीलेटर देखील उपलब्ध असल्याने आपत्कालीन काळात देखील रुग्णांना याठिकाणी उपचार मिळतील, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

मावळात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली असून सर्व रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी कान्हे येथे कोरोना समर्पित आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाचे योग्य व वेळेत उपचार मिळावेत यासाठी मावळातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कान्हे फाटा येथिल ग्रामीण रुग्णालयात कोरोना समर्पित आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले.

याठिकाणी 20 ऑक्सिजन बेड व 2 व्हेन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात आले असून कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी 10  डॉक्टर व 6  वैद्यकीय कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था देखील याठिकाणी करण्यात आल्याची माहिती कान्हे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.गणपत जाधव यांनी दिली.

ग्रामीण भागातील कोरोना सदृश रुग्णांना कोरोना संबधित सर्व उपचार या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तसेच याठिकाणी व्हेन्टीलेटर देखील उपलब्ध असल्याने आपत्कालीन काळात देखील रुग्णांना याठिकाणी उपचार मिळतील, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के,  डॉ. गुणेश बागडे, रुग्णालय अधीक्षक डॉ. गणपत जाधव, डॉ. सोनवणे, सरपंच विजय सातकर, सदस्य किशोर सातकर, डॉ.  शशांक धंगेकर,  डॉ. धोंडे,  भाऊ शिंदे, नामदेव शेलार आदी मान्यवर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.