Vadgaon News : शिवजयंतीनिमित्त श्री एकविरा विद्यालयातील निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ – शिवजयंतीनिमित्त श्री एकविरा विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 314 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनविषयक निबंधाचे विषय होते. विषय दिल्यानंतर शिक्षकांनी वर्गात एक आठवडा दररोज शिवाजी महाराजांच्या बद्दल माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी निबंध लिहिले.

कार्ला मावळ येथील श्री एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स या प्रशालेच्या वतीने यावर्षी सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शिवजयंतीनिमित्त आगळीवेगळी निबंध स्पर्धा घेण्यात आली.

314 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला,इ. 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी, शिवरायांचे बालपण, शिवरायांचे मावळे, रयतेचा राजा, जाणता राजा असे विषय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिले व सर्व वर्गशिक्षकांनी एक आठवडा दररोज एक तास वर्गात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची माहिती सांगितली, 314 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत ‌भाग घेतला असून प्रत्येक विद्यार्थ्याने अप्रतिम लेखन केले.

शालेय समितीचे अध्यक्ष सो. ना. गोपाळे व प्राचार्य भगवान शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शितल शेटे, उमेश इंगुळकर, मधुकर गुरव व जयश्री गरुड यांनी स्पर्धेचे आयोजन केले असून प्रत्येक वर्गातील निबंध तळेगाव व लोणावळा येथील मराठी विषयाच्या तज्ञ अध्यापकांकडून तपासून घेतले व विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. विद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिक व पालक कौतुक करीत आहेत. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा)भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष गोपाळे गुरुजी यांनी बक्षिसपात्र विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

वर्गनिहाय बक्षिसपात्र विद्यार्थी खालील प्रमाणे –
इ. 5 वी ज्ञानेश्वरीसंतोष हुलावळे
इ. 6 वी संजना‌ बर्मा पवार
इ. 7 वी अनुष्का विजय येवले
इ. 8 वी अ तन्वी विजय पिंगळे
इ. 8 वी ब पूनम दिलीप‌ भानुसघरे
इ. 9 वी अ सानिया अनिल गायकवाड
इ. 9 वी ब प्रतिमा संतोष जाधव
इ. 10 वी अ सानिया भाऊ येवले
इ. 10 वी ब स्नेहल पांडुरंग बोत्रे
सोहन गणेश थोरात
इ. 11 वी शुभम तोताराम चव्हाण
इ. 12 वी श्रुती राजू भानुसघरे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.