Vadgaon News : यंदा ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात दगडी गोटे उचलण्याचा कार्यक्रम पूजन करून रद्द

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर पटांगणात सालाबादप्रमाणे दगडी गोटी उचलणे व बैठका मारणे हा पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून, बैठक मारणे हि स्पर्धा न घेता फक्त वडगाव मधील सर्व व्यायाम शाळेतील मल्लांनी व क्रीडापट्टूनी प्रातिनिधिक स्वरूपात दगडी गोटी उचलण्याचा मान घेतला, व नंतर ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक स्वरूपात दगडी गोटी उचलून पोटोबाचा चांगभलं म्हणत दगडी उचलण्यात आल्या.

या प्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल पगडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नंतर क्रीडापट्टू नितीन म्हाळसकर, रविंद्र काकडे व गणेश जाधव यांना दगडी गोटी पुजन करण्याचा मान देण्यात आला.

यावेळी श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मावळ खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, क्रीडा प्रशिक्षक बिहारीलाल दुबे, बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव अरुण वाघमारे, मनोज ढोरे, नगरसेवक (गटनेते)दिनेश ढोरे, प्रसाद पिंगळे, बजरंग तालीमचे वस्ताद पै उमेश ढोरे, दिलीप वहिले, अनिल कोद्रे, रविंद्र म्हाळसकर, प्रविण ढोरे, भुषण मुथा, अतुल राऊत, नामदेव वारींगे, अतुल म्हाळसकर, केदार बवरे आदी उपस्थित होते, गर्दी होऊ नये म्हणुन वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने उपनिरीक्षक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.