Vadgaon News : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी तुकाराम ठोसर

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेल कार्याध्यक्षपदी तुकाराम ठोसर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

नियुक्ती पत्र तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांचे हस्ते व आमदार सुनिल अण्णा शेळके, संत तुकाराम सहकारी कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, मीडिया राज्य प्रभारी व तालुकाध्यक्ष ओबीसी सेल अतुल राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष आफताब सय्यद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक सरचिटणीस विशाल वहिले, शैलेश वहिले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.