Vadgaon News : वडगावात वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात; मुद्रा लोन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने वडगांव मावळ येथे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल मुद्रा लोन मेळाव्याला, तरुण, महिला आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सरदार वल्लभभाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री अतुल सावे, नागनाथ निडवडे, एजाज देशमुख, अतीक खान व जुनेद खान यांच्या मार्गदर्शनाखाली

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र (जैन) प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात 100 ठिकाणी एकाच वेळी “सरदार वल्लभभाई पटेल मुद्रा लोन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत वडगांव येथील मेळाव्याचे उदघाटन माजी मंत्री संजय भेगडे , भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी मंत्री भेगडे यांनी सरकारच्या वतीने मिळणाऱ्या या मुद्रा लोनचा समाजातील सर्व व्यापारी बांधवांना लाभ मिळावा यांसाठी बँकेने जास्तीतजास्त सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सर्व व्यापारी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे मत व्यक्त करत तालुक्यात इतर ठिकाणी देखील असे मेळावे घेण्याबाबत सूचना केली.

मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मावळ तालुक्यातील व्यापारी बांधव, महिला भगिनी यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नोकरीला व्यवसायाची जोड देऊन कुटुंबाचे अर्थकारण अधिक सक्षम करावे, असे आवाहन केले.

महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सायली बोत्रे म्हणाल्या, महिलांनी देखील व्यवसाय करण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रमात युनियन बँक ऑफ इंडिया वडगांव शाखेचे व्यवस्थापक रविंद्र पालडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तळेगांव शाखेचे व्यवस्थापक संतोष बागवे यांनी उपस्थित युवक, व्यापारी व उद्योजकांना मार्गदर्शन केले आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर व्यवसायासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांना नियमाप्रमाणे विनातारण कर्ज मंजूर होईल, असे आश्वासन दिले.

प्रास्ताविक संयोजक भूषण मुथा यांनी केले. त्यांनी यामध्ये मुद्रा लोन मेळाव्याची माहिती दिली.

माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सायली बोत्रे , वडगांव शहराध्यक्ष किरण भिलारे , नगरसेवक प्रविण चव्हाण, गटनेते दिनेश ढोरे , विजयराव जाधव , किरण म्हाळसकर , श्यामराव ढोरे, दशरथ खेंगले, सुनिता भिलारे, भाजपा ज्येष्ठ नेते दिपक बवरे, वसंतराव भिलारे, विवेक धर्माधिकारी, युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे, महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर, मावळ तालुका महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली ढोरे, वडगांव महिला मोर्चा कार्याध्यक्ष वैशाली म्हाळसकर, मुद्रा लोन मेळावा संयोजक भूषण मुथा,पदवीधर मतदारसंघ प्रमुख कल्पेश भोंडवे, अमोल ठोंबरे, मनोज बाफना, झुंबरलाल कर्णावट, दिपक भालेराव, अशोक चोरडिया, कुलदीप ढोरे, विठ्ठलराव घारे, नामदेव भसे, सुरेश बाफना, प्रितम बाफना, निखिलेश पुनमिया आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त व्यापारी बांधवांना मेळाव्यातून मुद्रा लोन संदर्भात माहिती मिळावी म्हणून फेसबुक आणि यु ट्यूब च्या माध्यमातून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते.

स्वागत वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे यांनी केले. सूत्रसंचालन मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी केले.आभार भाजपा वडगांव शहर सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.