Vadgaon News : कोरोना संकटाचा आपण एकत्रितपणे सामना करून हि लढाई जिंकूच : आरोग्य मंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करून हि लढाई जिंकूच यासाठी सर्वांनी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या मोहिमेत सहभागी होऊन हि मोहीम यशस्वी करावी असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या काळात नागरिकांना त्वरित व योग्य उपचार मिळावे यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने वडगाव येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे सोमवारी वडगाव मावळ येथे आले होते.

यावेळी सर्वप्रथम तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात प्रशिक्षण केंद्र येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला भेट दिली व तेथील सोयी सुविधा व उपचारांविषयी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारणा केली. त्यानंतर कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या ‘कोविड-19 मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रातील’ यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. केंद्रातील प्रत्येक कक्षांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी आवश्यक वैद्यकीय सामुग्री व साहित्य प्रातिनिधिक स्वरूपात वडगाव नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याकडे देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

मावळ तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता केलेल्या व्यापक विविध उपाययोजनांची पाहणी करून आमदार सुनिल शेळके व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या उपक्रमातील कामाविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ व उद्योजक अभय फिरोदिया (फोर्स मोटर्स लि.) व शंकरराव बा. शेळके यांच्या वतीने मावळ तालुक्यातील जनतेच्या मोफत सेवेसाठी दिलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार सुनिल शेळके, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबन भेगडे, जिल्हापरिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, तळेगावच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील दाभाडे, जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले व इतर मान्यवर उपस्थित होते .

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसोबत आरोग्यमंत्री संवाद साधत असताना सर्व रुग्णांनी सोयीसुविधा बाबत समाधान व्यक्त करीत ‘मावळ का आमदार कैसा हो, सुनिलआण्णा जैसा हो.’ अशा घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.