Vadgaon News : अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांचा कोरोनायोद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव

अंगणवाडीसाठी अत्यावश्यक  धान्य कोट्या, डिश, पंखा, कुकर आदी साहित्याचे वाटप : Anganwadi worker and health worker honored with Coronayodha Trophy

एमपीसीन्यूज : वडेश्वर ग्रामपंचायतचा कार्यकाल समाप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच वडेश्वर ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांना करोनो योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

त्याचबरोबर तसेच ग्रामपंचायतीच्या 10 टक्के निधीतून आंगणवाडीसाठी अत्यावश्यक  धान्य कोट्या, डिश, पंखा, कुकर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व कर्मचारी यांना माजी सरपंचांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

शासकीय आश्रम शाळा -वडेश्वर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर, सरपंच शांताराम लष्करी, सरपंच संतोषी खांडभोर, बबनराव हेमाडे, चिंदु हेमाडे, उपसरपंच जिजाबाई जगनाडे, सदस्य संजय गराडे, किरण हेमाडे, कुंडलिक लष्करी, आशा उंबरेकर, गीताबाई खोपे, बायडाबाई कशाले, सुनीता लष्करी आदी सदस्य व ग्रामसेवक टी. जी. पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमूख राजेश खांडभोर यांनी आपले ग्रामपंचायत सदस्यपदाचे मानधन आंगणवाडीताई व आरोग्यसेविका यांना दिले.

या निमित्तने राजकीय हेवेदावे मतभेद बाजूला सारून ग्रामपंचायतचे सर्व लोकप्रतिनिधी व माजी सरपंच व ग्रामस्थ एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.