Vadgaon News : रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करा : ‘भाजयुमो’ची मागणी

एमपीसीन्यूज : वडगाव मावळ येथील स्मशानभूमी जवळील रस्त्यावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वडगाव शहर भाजपा युवा मोर्चाच्यावतीने  नगराध्यक्ष मयुर ढोरे व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात त्वरीत अंमलबजावणी न झाल्यास वडगांव नगरपंचायतवर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे

या वेळी तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे,नगरसेवक दिलीप म्हाळसकर, कार्याध्यक्ष शेखर वहिले, विनायक भेगडे, राजेश म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदीजन उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव स्मशानभूमीजवळ पूर्वेकडून गावात येणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकी चालक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय अपघात होण्याची शक्यता असते.

काही वर्षापूर्वी त्याठिकाणी अनेक अपघात सुद्धा झालेले असून एक महिलेला आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर उपाययोजना व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास युवा मोर्चाचे वतीने वडगांव नगरपंचायतवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी दिला आहे.

या वेळी तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे,नगरसेवक दिलीप म्हाळसकर, कार्याध्यक्ष शेखर वहिले,विनायक भेगडे,राजेश म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदीजन उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.