Vadgaon News : सरकारला जागे करण्यासाठी पोटोबा मंदिरासमोर घंटानाद

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून सर्व मंदिरे बंद आहेत.

 एमपीसीन्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थान व अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराज मंदिरातील सभा मंडपामध्ये आघाडी सरकारला जाग येण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर म्हणाले, भाविकांची श्रद्धास्थान व पुजारी मंडळी तसेच सर्व फुल विक्रते, शेतकरी मंडळी यांचा उपजीविकेचे स्थान म्हणून तरी या सरकारने लवकरात लवकर मंदिरांचे दरवाजे उघडावेत.

यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, वारकरी मंडळाचे, जिल्हा अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, देवस्थानचे सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, सल्लागार ॲड. तुकाराम काटे, मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, ह.भ.प. पांडुरंग पारखी, शंकर बोबडे, गणेश महाराज जांभळे, पुजारी सुरेश गुरव, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, संतोष ढमाले,प्रकाश निमकर आदींसह भाविक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.