Blood donation : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 801 बॅग रक्त संकलन

एमपीसी न्यूज : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण 801 बॅग रक्त संकलन झाले आहे.(Blood donation)अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली आहे. त्यांनी रक्तदान करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत पाच ठिकाणी मतदान शिबिरे घेण्यात आली होती. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून (Blood donation) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळ, सर्व ग्रामपंचायत, सर्व पोलीस पाटील, सर्व होमगार्ड, महिला दक्षता समिती, सर्व सेवाभावी संस्था, तसेच सर्व नागरिकांच्या मदतीने व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

Ajit foundation : वंचित मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक!

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपूल दूरक्षेत्र, श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव, माऊली लॉन्स सुपा, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरष्णे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. एकूण 801 बॅग रक्त संकलन झाले.(Blood donation) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे 165, करंजेपूल दूरक्षेत्र येथे 251, श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय मोरगाव येथे 104, माऊली लॉन्स मंगल कार्यालय सुपा येथे 179, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरष्णे येथे 101 बॅग रक्त संकलन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.