vadgaon : टाकवे – वडेश्वर गटातील अंगणवाड्या दुरुस्तीसाठी 15 लाखांचा निधी मंजूर; जि. प. सदस्य शोभा कदम यांचा यशस्वी पाठपुरावा

Rs 15 lakh sanctioned for repair of Anganwadas in Takve -Vadeshwar group; Successful follow up of Z P member Shobha Kadam

एमपीसीन्यूज :  आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा सुदामराव कदम यांच्या पाठपुराव्याने टाकवे – वडेश्वर मतदार संघात निसर्ग चक्रीवादळात नुक़सान झालेल्या अंगणवाड्या दुरुस्तीसाठी 15 लाखांचा निधी पुणे जिल्हा परिषदने मंजूर केला आहे. तसेच भंडारा डोंगरावर संतश्रेष्ठ जगतगुरु श्री.तुकाराम महाराज यांच्या मंदिरा जवळ एक हायमास्ट दिवा बसवण्यात आला.

या मध्ये भोयरे (2 लाख 76 हजार, कल्हाट ( १ लाख) ) वडेश्वर- सटवाईवाडी ( 1 लाख), वडेश्वर-शिंदेवाडी (70 हजार), सावळा- गोंटेवाडी ( 1 लाख 20 हजार, नाणे – उकसान पुनर्वसन (1 लाख 61 हजार), घोणशेत (1 लाख 50  हजार), घोणशेत- वाऊंड (90 हजार), माळेगाव बु!! -पिंपरी (1  लाख 63  हजार), उकसान (66 हजार), करंजगाव – पालेनामा (1 लाख 7 हजार), सांगीसे-वेल्हवळी (77  हजार) अशा एकूण 15 लाख रुपये निधीचा समावेश आहे.

हा निधी जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने उपलब्ध झाला आहे.

जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम व कदम परिवार यांच्या वतीने भंडारा डोंगरावर संतश्रेष्ठ जगतगुरु श्री.तुकाराम महाराज यांच्या मंदिरा जवळ एक हायमास्ट दिवा बसवण्यात आला.

देवस्थानचे ट्रस्टी जोपाशेठ पवार, जगन्नाथ नाटक पाटील, सुदामराव कदम व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.