Vadgaon Sheri : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या मोफत आरोग्य शिबिराचा ५०० नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी विभाग व पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर वडगावशेरी व विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे आज (रविवारी) पार पडले . राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपाध्यक्ष रेणुका चलवादी यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा  ५०० नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी वडगाव शेरी विभागाचे अध्यक्ष राजेंद्र खांदवे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा अश्विनी परेरा, माजी नगरसेवक हुलगेश चलवादी, नारायण गलांडे, उषाताई कळमकर, शीतल टिंगरे, नीता गलांडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित डॉक्टर व स्टाफचा सत्कार गुरू चलवादी व आकाश चलवादी यांच्या हस्ते करण्यात आला.

या शिबिरात किरकोळ तपासणी, दातांची तपासणी, ब्लडप्रेशर, शुगर महिलांची व मुलांची विशेष तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. राजीव गांधी रुग्णालय व कमला नेहरू रुग्णालय यामधील वैद्यकीय पथकाने तसेच डॉ.पी. के. भिमानी , बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील, डॉ. अभय गर्ग, डॉ. मयूर आगरवाल, डॉ. सचिन नाड, डॉ. प्रणाली सातपुते, डॉ. स्मृती खैरे यांचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.