Vadgaon : आमदार शेळके यांच्या ‘मदत नव्हे कर्तव्य’ला ‘शिवक्रांती’चे ५१ हजारांचे साहाय्य

एमपीसी न्यूज : सध्या लॉकडाऊनमध्ये हजारो कामगार अडकून पडले आहेत. या कामगारांसह मावळ तालुक्यातील कोणीही उपाशी राहणार नाही म्हणून आमदार सुनील शेळके यांनी अशा गरजू आणि गोरगरिबांना ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत अन्नधान्य वाटपास सुरुवात केली आहे. या कार्यास हातभार म्हणून शिवक्रांती कामगार संघटनेतर्फे 51 हजार रुपयांचे योगदान देण्यात आले आहे.

दरम्यान, अन्नदानासाठी दिलेली रक्कम ही मदत नसून ते आमचे सामाजिक कर्तव्यच आहे, असे मत शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड विजय पाळेकर यांनी सांगितले.

देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश बंदिस्त झाला आहे. अशा परिस्थितीत मावळमधील बहुतांश लोकांना प्रामुख्याने गोरगरीब, हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांपुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

या परिस्थितीत स्वतः आमदार सुनील शेळके अशा लोकांना किराणा व भाजीपाल्याचे मोफत वाटप करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याला शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस अॅड विजयराव पाळेकर यांनी ५१ हजार रूपयांचा धनादेश आमदार सुनील शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

त्यावेळी संघटनेचे खजिनदार रवींद्र साठे, मावळ वार्ता फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष रमेश पाळेकर, लोणावळा शहर शिवसेना उपप्रमुख प्रवीण काळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.