vadgaon : मावळात आज सहा जण कोरोना पॉझिटिव्ह; एकाच मृत्यू

Six corona positive in Maval today; Single death : तालुक्यात एकूण कोरोना रुग्ण 176

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात आज, गुरुवारी लोणावळा व तळेगाव येथील प्रत्येकी दोन, तर कामशेत व वराळे येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर कामशेत येथील कोरोनाबाधित 70  वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकात लोहारे यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 176, तर मृतांची संख्या नऊ झाली आहे. कामशेत येथील 70 वर्षीय पुरुषाला 19 जूनपासून कावीळ झाली होती व ते लोहगाव येथे राहावयास गेले होते. 2 जुलै रोजी ते पुन्हा कामशेत येथे आले.

सध्या त्यांच्यावर तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दि.6 जुलै रोजी त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. गुरुवारी सकाळी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

तळेगाव येथील एका 26 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाचे पुण्याहून आलेले सासरे बाधित झाले होते. त्यामुळे या रुग्णाचाही स्वॅब घेण्यात आला होता. शिंदेवस्ती ( तळेगाव ) येथील एका 28 वर्षीय गृहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

खासगी कंपनीत काम करणाऱ्या वराळे येथील एका 28 वर्षीय कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांगरगाव ( लोणावळा ) येथील एका महिलेचा अहवाल 4 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कातील 70 वर्षीय पती व 50 वर्षीय मुलाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

कामशेत येथील एका 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कातील 11 जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या 176 वर पोचली आहे. त्यात शहरी भागातील 71 तर ग्रामीण भागातील 105 जणांचा समावेश आहे.

तळेगाव येथे सर्वाधिक 54, लोणावळा येथे 14, तर वडगाव येथील रुग्ण संख्या तीन झाली आहे. मृतांची संख्या नऊ झाली असून 78 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 89 जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे हद्दीतील एकूण रूग्णांची संख्या 54 झाली असून त्यापैकी 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर सक्रिय रूग्णांची संख्या 30 झाली आहे. तर मृतांचा आकडा 03 आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like