Vadgaon : वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी सुचिता पानसरे

सुचिता पानसरे यांची सेवा चार वर्षे झाली आहे. त्या सर्वाधिक तरुण मुख्याधिकारी आहेत. : Suchita Pansare as the Chief Officer of Wadgaon Nagar Panchayat

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी सुचिता नवनाथ पानसरे यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांची बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याजागेवर कुही नगरपंचायत (नागपूर) येथून बदली होऊन आलेलया सुचिता पानसरे यांची नियुक्ती झाली. सुचिता पानसरे यांची सेवा चार वर्षे झाली आहे. त्या सर्वाधिक तरुण मुख्याधिकारी आहेत.

त्यांनी गुरूवारी (दि 13) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

_MPC_DIR_MPU_II

वडगाव नगरपंचायत नव्याने स्थापन झाल्यानंतर मुख्याधिकारीपदी सुवर्णा ओगले यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गेली दीड वर्ष मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.

कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन त्याबाबतच्या उपाययोजनांचा भाग म्हणून ओगले यांची बदली करण्यात आली असल्याचे नगरविकास विभागाचे सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी पाठविण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

ओगले यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असून तोपर्यंत त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत राहतील असे आदेशात म्हटले आहे.

नवनियुक्त मुख्याधिकारी सुचिता पानसरे म्हणाल्या, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचा डीपी प्लॅन पूर्ण करणे. नवीन पाणीपुरवठा योजना, प्रशासकीय इमारत, घनकचरा व्यवस्थापन व बंदिस्त नाले व गटारी आदी प्रश्न प्राधान्याने पूर्ण केले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.