Vadgaon : टाकवे बु. येथील 225 गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्यांचा रोजगार बुडाला असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत टाकवे बु. मधील उपसरपंच रोहिदास असवले यांच्या पुढाकाराने ‘वेव्ह व सोएक्स प्लोरा’ कंपनीच्या सहकार्याने 225  गरजूंना महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे कीट  देण्यात आले.

टाकवे बु. परिसरात औद्योगिक वसाहत आहे. लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने गावातील काही लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आज (बुधवारी) सकाळी गरजू नागरिकांना जीवनावश्यक कीट देण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करुन वाटप करण्यात आले.

टाकवे आणि परिसरातील गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल. शासनाने केलेल्या आवाहनानुसार कुठलीही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी आम्ही या भागात घेऊ’ असे उपसरपंच रोहिदास असवले व पोलीस पाटील अतुल असवले यांनी सांगितले.

या वेळी सोएक्स कंपनीचे मॅनेजर शेख, त्रिपाठी, बर्गी, वेव्ह कंपनीचे देशपांडे व बळीराम पिंगळे, उपसरपंच रोहिदास असवले, ग्रामसेवक एस. बी. बांगर, पोलीस पाटील अतुल असवले, माजी उपसरपंच अविनाश असवले, स्वामी जगताप, उद्योजक नवनाथ आंबेकर, विकास असवले, बाबाजी घोजगे, सुभाष असवले, मुख्याध्यापक जरग उपस्थित होते.

त्याचबरोबर  माजी सदस्य अतिश मोरे, सेवा फाउंडेशनचे संतोष  क्षीरसागर, माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत असवले, उमाकांत मदगे सदस्य सारिका जांभूळकर, भिमराव साबळे, गुलाब जांभुळकर, चेअरमन दत्ता घोजगे, कोतवाल बाबाजी असवले, लेखनिक सुशील वाडेकर, शंकर गुनाट तसेच ग्रुप ग्रामपंचायत कर्मचारी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.