Vadgaon : मावळात कोरोना रूग्णांची संख्या दिडशे पार; शहरांपेक्षा ग्रामीणमध्ये रुग्ण अधिक

The number of corona patients in Maval has crossed one and a half; More patients in rural areas than in cities : सध्या मावळ तालुक्यात 79 सक्रिय कोरोना रुग्ण असून कोरोनाबळींची संख्या 8 झाली आहे

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून आज, मंगळवारी तळेगाव दाभाडे येथे 2, लोणावळा, इंदोरी, चांदखेड, पाचाणे, गहुंजे, वराळे या ठिकाणी प्रत्येकी 1 अशा एकूण 8 रूग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. तालुक्यात आतापर्यंत एकूण- 153 (शहरी- 59 व ग्रामीण-94) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 66 जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या मावळ तालुक्यात 79 सक्रिय कोरोना रुग्ण असून कोरोनाबळींची संख्या 8 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील लक्ष्मी बाग काॅलनीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या 54 वर्षीय व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील त्यांची 45 वर्षीय पत्नी व 23 वर्षीय मुलीचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला.

लोणावळा येथील 40 वर्षीय व्यक्ती, वराळे येथील 25 वर्षीय व्यक्ती ह्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटर येथे दाखल असून गहुंजे येथील 42 वर्षीय महिला बालेवाडी येथील रूग्णालयात दाखल आहे. यांचाही कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

पाचाणे येथील 35 वर्षीय व्यक्ती वाकड येथील रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील होती. त्यामुळे त्यांचाही कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती हिंजवडी येथील रुग्णालयात दाखल आहे.

चांदखेड येथील 40 वर्षीय व्यक्ती हाय रिस्क संपर्कातील असल्याने त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहेत.

इंदोरी येथील 24 वर्षीय महिला पतीच्या निकटच्या संपर्कातील असल्याने त्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या रुग्णावर राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे हद्दीतील कोरोना रूग्णांची संख्या 48 झाली असून 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या 28 असून मृत पावलेल्यांची संख्या 3 आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ. प्रवीण कानडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.