Vadgaon : मावळ पंचायत समिती येथे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

tribute to Chhatrapati Shahu Maharaj at Maval Panchayat Samiti

एमपीसी न्यूज : मावळ पंचायत समिती येथे छत्रपती  शाहू महाराज यांची 164 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  मावळच्या सभापती निकिता नितीन घोटकुले यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन सभापती घोटकुले यांनी यावेळी केले. सहाय्यक गटविकास अधिकारी एल. आर. वाजे,  डी.  डी. खरात व  इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार के. एल. झगदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.