Vadgaon : संभाजीनगरमध्ये वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील संभाजीनगरमध्ये वाहन (Vadgaon) चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. सोसायटीच्या पार्किंग मधून वाहने चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राहुल उत्तम गुंजाळ (वय 24, रा. किर्तीजा अपार्टमेंट, संभाजीनगर, वडगाव) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14/जेडी 8031) सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली.

रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. तसेच संभाजीनगर मधील जय गणेश अपार्टमेंट मधून विशाल एकनाथ कुंभार (वय 32) यांची देखील दुचाकी (एमएच 11/सीएम 4008) चोरीला गेली आहे.

संभाजीनगर मध्ये मागील काही दिवसांपासून रस्त्याची कामे सुरु आहेत. रस्त्याचे काम सुरु असताना संबंधित सोसायटी मधील नागरिकांना त्यांची वाहने बाहेर पार्क करावी लागतात.

नागरिक जवळच असलेल्या मैदानात अथवा रस्त्याच्या बाजूला, सोसायटी पासून काही अंतरावर वाहने पार्क करतात. वाहने चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune-Lonavala Local Train : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; पुणे-लोणावळा दरम्यानच्या 14 लोकल रद्द

स्थानिक रहिवासी स्वाती झांबरे म्हणाल्या, “संभाजीनगर परिसरात (Vadgaon) वाहन चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. रस्त्याचे काम सुरु असल्याने आम्हाला वाहने सोसायटीच्या बाहेर मोकळ्या जागेत पार्क करावी लागत आहेत.

नगरपंचायतच्या वतीने परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. तसेच परिसरात पोलीस गस्त वाढवावी. ज्यामुळे अशा चोरीच्या घटना इतर अनुचित प्रकारांना आळा बसेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.