VadgaovMaval : नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – अवकाळी पावसामुळे मावळ तालुकाच्या भातशेती व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतक-यांना भरपाई मिळावी, अशी मागणी मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे व सचिव रामदास पडवळ यांचे सह्या असलेले निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

मावळ हे भातशेतीचे आगार आहे. भातपीक हे मावळातील प्रमुख पीक असून भातपीक कापणीसाठी तयार झाले होते. मात्र, याच काळात मोठया प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेतीची पाहणी करून त्यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

यावेळी हभप नाथामहाराज शेलार, सुनीलमहाराज वरघडे, हभप नंदकुमार भसे, हभप रामदास पडवळ, हभप भरत येवले, हभप दिलीप वावरे, हभप संतोष शेलार, हभप शांताराम गायखे, हभप दत्तात्रय हजारे, हभप ज्ञानेश्वर जगताप, हभप नितीन आडीवळे, हभप दीपक वारींगे, हभप सुभाष देशमुख, हभप बजरंग घारे, हभप हनुमंत थोरवे, हभप बाळोबा वारींगे, हभप एकनाथ भानुसघरे, हभप सुखदेव गवारी, हभप बंडू कदम, हभप सदाशिव पेटकर, हभप भाऊ रासे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.