Vadgaon Maval: मावळ तालुक्यात तीन ग्रामपंचायती भाजपकडे अन् एक राष्ट्रवादीकडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात आली. यातील चार ग्रांमपंचायतीसाठी मतदान झाले. याची मतमोजणी वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात झाली. यात नाणोली तर्फे चाकण, औंढे ग्रामपंचायत, टाकवे खुर्द आणि ओझर्डे याचा समावेश होता. यातील नाणोली तर्फे चाकणमध्ये केवळ सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली असून यातील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच यातील चारपैकी तीन सरपंच भाजपचे तर, एक सरपंच राष्ट्रवादीचे आहेत असा दावा आमदार बाळा भेगडे यांनी केला आहे.

या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे: विजयी उमेदवार
नाणोली तर्फे चाकण –  सरपंच- मोनिका स्वप्निल शिंदे (254).

औंढे ग्रामपंचायत – सरपंच- अरूण बबन चव्हाण (550 मते), वार्ड 1 – निलेश किसन नाणेकर (259), रोषना नवनाथ पाठारे (257), सुरेखा किरण केदारी (238). वार्ड क्र 2 – अरूण बबन चव्हाण (259), रत्ना संदीप खाडे (255) वार्ड क्र 3- बिनविरोध.

टाकवे खुर्द ग्रामपंचायत – सरपंच, तुशांत कैलास ढमाले (325), वार्ड क्र. 1 – ज्योती रामचंद्र धुमाळ (192), वार्ड क्र 2- मनिषा तानाजी गरूड (146), शालन सुनील गरूड (120), विजय केशव गरूड (143), वार्ड क्र 3- ज्योती तानाजी ढमाले (195), संपत विठ्ठलराव गरूड (169).

ओझर्डे ग्रामपंचायत – सरपंच- बाळू नथु पारखी (450), वार्ड क्र 1- दत्ता नथु ओझरकर (126), वार्ड क्र 2 – स्वप्निल तुकाराम येलमारे (154), आशा अंकुश ओझरकर (185), अंजना गणेश ओझरकर (186), वार्ड क्र 3 – मंगल पंढरीनाथ पारखी (243).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.