Vadmukhwadi Crime News : अनधिकृत बांधकामाची पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्याच्या रागातून दोघा भावांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती महापालिकेच्या अधिका-यांना दिली. या कारणावरून दोघांनी मिळून दोन भावांना लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना 4 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता वडमुखवाडी येथे घडली. याबाबत बुधवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश उद्धव गिलबिले (वय 30, रा. वडमुखवाडी, च-हॉल बुद्रुक), सुनील लक्ष्मण गिलबिले, अशी जखमींची नावे आहेत. याबाबत महेश गिलबिले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी विक्रम रमेश गिलबिले (वय 31), सचिन सुभाष गिलबिले (वय 38, दोघे रा. वडमुखवाडी, च-होली बुद्रुक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता बांधकाम केले आहे. त्यांचे बांधकाम अनधिकृत आहे, अशी माहिती फिर्यादी फिर्यादी यांनी महापालिकेच्या अधिका-यांना दिली. या रागातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ यांना लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले आहेत.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.