Crime News : वडमुखवाडी येथे गोळीबार करणाऱ्याला 48 तासात अटक

एमपीसी न्यूज वडमुखवाडी येथे एकाचा पाठलाग (Crime News) करत त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळी बार कऱणाऱ्याला शस्त्रासह पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने 48 तासात अटक केले आहे. हि कारवाई मंगळवारी (दि.21) उशीरा करण्यात आली.

 

हरीओम पांचाळ (वय 20) असे एटक आरोपीचे नाव असून त्याने शनिवारी (दि.18) सिद्धेश गोवेकर याच्यावर पाठलाग करून गोळीबार केला होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करत पोलिसांना खबर मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी पांचाळ हा आळंदी देवाची येथील वडगाव रोडवरील मंगल कार्यालयाच्या शेजारी आरोपी असून तो दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत आहे. यावरून पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचला व आरोपीला ताब्यात गेतले. त्याची अंग झडती घेतली असता एक पिस्तोल व एक जिवंत काडतुस मिळाले, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एवज जप्त कऱण्यात आला.

 

Bhosari News : पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांना मिळाले त्यांचे चोरीला गेलेले मोबाईल

 

आरोपीने सिद्धेश याच्याशी झालेल्या जुन्या भांडणातून त्याचा साथीदार मुन्ना शेख यांच्या साथीने केल्याचे कबुल केले. आरोपी हा सराईत असून तो कोयता गँग चा सदस्य आहे त्याच्यावर (Crime News) दिघी पोलीस ठाण्यात बेकाय शस्त्र बाळगणे व गोळीबार करत खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकऱणी गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत.

 

हि कारवाई गुन्हे शाखा तीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार सचिन गोरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, शशिकांत नांगऱे, समीर काळे, रामदास मेरगळ, महेश भालचिम, निखील फापाळे, तांत्रिक तपास नागेश माळी यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.