Vadmukhwadi News : वडमुखवाडी येथील प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार 

एमपीसीन्यूज  :  प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था ( रामेती ) वडमुखवाडी,चऱ्होली या कार्यालयाच्या आठ वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या इमारतीचा वापर सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच येथे भेट देत इमारतीची पाहणी करुन कृषी विभागासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही कार्याच्या सूचना दिल्या आहेत. 

प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था ( रामेती ) वडमुखवाडी,चऱ्होली या कार्यालयाची 2012 पासून  वापरात नसलेल्या तसेच 8 कोटी व त्यापेक्षाही जास्त ख़र्च झालेल्या या प्रशिक्षण केंद्राचा वापर होण्याकरिता व त्या ठिकाणी झालेल्या आर्थिक अनियमितता याची चौकशी बाबतीत वडमुखवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ते  वैभव विठ्ठल तापकीर यांनी पंतप्रधान कार्यालय व महाराष्ट्र शासनाशी केलेल्या तक्रारीच्या अनुषंंगाने दि.  8 डिसेंबर 2020 रोजी   राज्याचे कृषी मंत्री दादा  भुसे  यांनी प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था ( रामेती ) वडमुखवाडी चऱ्होली या ठिकाणी  भेट दिली.

त्यावेळी या  विनावापर पडून असलेलया  इमारतींचा वापर सुरु करण्याकरिता   वैभव  तापकीर यांनी त्यांना  रामेती बाबत सर्व वस्तुस्थितीची माहिती दिली. तसेच  त्याबाबत २०१७ पासून पाठपुरावा केला जात असल्याचे सांगत  सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.

त्यानंतर मंत्री भुसे यांनी  कृषी अधिकारी व पिंपरी चिंचवड महापालिका  अधिकाऱ्यांना  रामेतीच्या  विनावापर पडून असलेली इमारतीचा वापर लवकर सुरु करण्याच्या  सूचना केल्या. त्यामुळे 2012 पासून प्रलंबित असलेल्या  हा विषय  या निमित्ताने मार्गस्थ लागणार असलयाचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी महिती अधिकार कार्यकर्ते वैभव तापकीर यांच्यासह   ॲड. मयूर तापकीर, मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर, प्रमोद तापकीर, निखिल तापकीर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.