Moshi News : वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये यांचे निधन

एमपीसी न्यूज – मोशी येथील रहिवासी आणि वैदर्भीय युवा कवी नीलेश म्हसाये (वय 37) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

व्हॉल्सवॅगन कंपनीत नोकरी करणारे नीलेश हे केवळ 37 वर्षाचे असल्याने त्यांच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कवी, सूत्रसंचालक, युवाचैतन्य दिवाळी अंकाचे संपादक, मालक, सामाजिक कार्यकर्ते असे अनेक त्यांची लोभस रूपे होती.

मनमोकळ्या स्वभावाने त्यांनी इथे अनेक मित्र जोडल्याने त्यांच्या मृत्यूने पिंपरी-चिंचवड साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने राजन लाखे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.