Vaishali Samant’s new song : वैशाली सामंत घेऊन येतेय ‘सुवासिनी’

vaishali samant new song 'Suvasini' 'सुवासिनी'  हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ते विशेष चर्चिलं जात आहे.

एमपीसी न्यूज – अवधूत गुप्तेने लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या दाजिबांनी एकेकाळी मनोरंजनसृष्टीत हलचल माजवली होती. ‘ऐका दाजिबा’ अशी वैशाली सामंतने मारलेली हाक त्यावेळी फारच फेमस झाली होती. दाजिबा म्हणजे वैशाली सामंत असे समीकरणच झाले होते. फ्रेश, सुरेल आवाजाच्या या गायिकेने पुढे अनेक गाणी गाजवली.  सध्या तिचं ‘सुवासिनी’  हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून ते विशेष चर्चिलं जात आहे.

सागरिका दास यांच्या संकल्पनेतून ‘रेट्रो V’ या म्युझिक अल्बम मधील ‘सुवासिनी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची रचना श्रीपाद जोशी यांनी केली असून प्रसिद्ध संगीतकार नीलेश मोहरीर यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री सायली साळुंखे झळकली आहे. तसंच या म्युझिक अल्बममधील गाणी या वर्षभरात प्रदर्शित होणार आहेत. या अल्बममध्ये एकूण आठ गाण्यांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

सागरिका म्युझिक आणि गायिका वैशाली सामंत यांचे नातं अनेक वर्षांपासून आहे.  ऐका दाजीबापासून सुरु झालेला हा बॉंड पुढे ‘मस्त चाललंय आमचं’,  ‘मेरा दादला’,  ‘अंगणी माझ्या मनाच्या’,  ‘घोटाळा’ अशा अनेक गाण्यांनी जोपासला.  या वर्षी या हिट गाण्यांच्या प्रवासात ‘सुवासिनी ‘ या गीताचा होणारा समावेशही रसिक श्रोत्यांना आनंद देणारा ठरेल . ‘रेट्रो V’ या अल्बममध्ये आठ रेट्रो स्टाइल गाण्यांचा असलेला समावेश हे या अल्बमचे वेगळेपण ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.