Nigdi : चैत्री एकादशी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना

एमपीसी न्यूज- चैत्री एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्राधिकरणातुन वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना व औषधे घेऊन डाॅक्टरंचे व स्वयंसेवकांचे पथक आज, रविवारी पंढरपूरला रवाना झाले. 

या पथकाला निरोप देण्याच्या प्रसंगी पुणे जिल्हा वारी व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, कमलाकर कुलकर्णी उपस्थित होते. सेवेसाठी जाणाऱ्या पथकामध्ये विश्वस्त सुरेश मानकुमरे, प्रभाकर कोंबेकर, डॉ. प्रदीप पाटील, सिताराम अहेर, किशोर गायकवाड, संतोष नलवडे व सातव सहभागी झाले आहेत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 24 तास ही चालू राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.