Pune : बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत वैष्णवीचे यश

एमपीसी न्यूज – बँकॉक येथे इंडियन आर्ट कल्चरल सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत तुकाई दर्शन हडपसर येथील वैष्णवी सुनील औरसंग हिने मोठ्या गटात एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. प्रसिद्ध कथ्थककार पदमविभूषण पंडित बिरजू महाराज यांची नात इंडियन क्लासिकल डान्सर सिंजींनी कुलकर्णी यांच्या हस्ते वैष्णवी सुनील औरसंग हिला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

वैष्णवी गेली १२ वर्षे नृत्य करत असून भरतनाट्यमचा विद्यापीठाचा पदविका अभ्यास पूर्ण केलेला असून, अखिल भारतीय महाविद्यालयाचा विशारदचा अभ्यास चालू आहे. वैष्णवीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक बक्षिसे मिळविली आहेत. वैष्णवीची आई अश्विनी या पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी संस्थेत कार्यरत असून तिचे वडील सुनील हे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. आपल्या आई वडिलांच्या पाठबळामुळे आपण हे यश मिळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.