Vanavadi News : वानवडी येथून सुमारे 12 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, दोन आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – वानवडी येथे कारावाई करत अंमली पदार्थ विरोधी (Vanavadi News ) पथकाने तब्बल 12 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. हि कारवाई शुक्रवारी (दि.17) केली असून यात दोन जणांना अटक केली आहे.

 

लायनल लेझली मेस्करेनस (वय 33 रा.वानवडी) व रसल अॅन्थोनी रेनॉल्ड चंदनशिव (वय 21 रा. वानवडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अमंलदार साहिल शेख व अझिम शेख यांना बातमीदाराबाबत माहिती मिळाली की, दोघेजण दुचाकीवरून वानवडीतील एस बँक येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याचे सांगितले.

 

Pune News : पुण्यात भारत आणि 24 आफ्रिकी देशांच्या  सैन्यदलांत मंगळवारी संयुक्त सराव

 

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता दोन संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून पोलिसांनी 11 लाख 96 हजार 200 रुपयांचेअमंली पदार्थ सापडले त्यात 1 लाख 5 हजार रुपयांचे एम.डी.एम च्या गोळ्या, 3 लाख 26 हजार रुपायांचे एमडी (मेफेड्रॉन), 1 लाख 34 हजार रुपयांचे एल.एस.डी पेपर, 10 हजार रुपयांचे मशरुम, 75 हजार रुपयांचे चरस, 3 लाख 90 हजार रुपयांचे हॅश ऑईल,21 हजार 300 रुपयांचे ओझोन कुश गांजा, 30 हजार रुपयांचा गांजा मोबाईल, 40 हजार 300 रुपये रोख,दुचाकी व जनकाटा असा एवज जप्त करण्यात आला आहे.

 

 

याप्रकऱणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात (Vanavadi News ) आला असून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दिगंबर चव्हाण हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.