Chikhali: घरकुलमध्ये टोळीकडून वाहनांची तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण

Vandalism of vehicles by gang in Gharkul chikhali pimpri chinchwad

एमपीसी न्यूज- टोळीतील एका सदस्याचा खून झाल्याने चिडलेल्या आक्या बॉन्ड टोळीने चिखलीतील घरकुल परिसरात धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली. त्यामुळे घरकुल परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरकुल परिसरातील वर्चस्वावरून आक्या बॉन्ड टोळी आणि अमित चव्हाण टोळी यांच्यात वाद आहे. त्यातूनच 15 मे रोजी अमित चव्हाण याच्यावर खुनी हल्ला झाला होता.

त्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड टोळीतील अनिकेत रणदिवे याचा काल शुक्रवारी चव्हाण टोळीकडून खून करण्यात आला.

त्यामुळे आक्या बॉन्डची टोळी संतापली आहे. या रागातून या टोळीने आरोपी राहत असलेल्या चिखली घरकुलमध्ये धुडगूस घातला. वाहनांची तोडफोड केली.

यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती आहे. पोलिसाचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.