Varaje: शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या समस्या मार्गी लावणार – संजय भोर

एमपीसी न्यूज – शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या समस्या मार्गी लावणार असल्याचे अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक संजय भोर यांनी सांगितले.

शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मनोहर दांगट, अविनाश जोगदंड, रामेलेक्सचे प्रमुख राम जोगदंड, चंद्रशेखर मोरे, अॅड. चंद्रभागा चव्हाण, डॉ. संजीवनी गोगावले, राहुल अमृतकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता नंदे, पोलीस नाईक दत्तात्रय ताकवले, असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवणे इंडस्ट्री भागात अनेक तरुण रोजगारासाठी भटकंती करीत असतात. मुख्य रस्त्याला हे कार्यालय असल्याने त्याचा लाभ या तरुणांना होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.