Khed : वराळेत परप्रांतीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार  

एमपीसी न्यूज : शौचालयास गेलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीवर उत्तरप्रदेशच्या नराधमाने बलात्कार केल्याचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे.(Khed) पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वराळे येथे  हा प्रकार घडला असून, म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.    

पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिदानंद राजेंद्र विश्वकर्मा ( सध्या  रा. वराळे, ता. खेड, मूळ रा. उत्तरप्रदेश ) याच्यावर रविवारी बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्यास बेड्या ठोकल्या आहेत. अधिक माहिती अशी की, (Khed) फिर्यादी यांची चार वर्षांची मुलगी रविवारी शौचालयास गेली होती. त्यावेळी सचिदानंद हा तिच्या पाठीमागे गेला व त्याने तिच्यावर अत्याचार केला. म्हाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.