BNR-HDR-TOP-Mobile

Ravet : भगवद्गीता जयंतीनिमित्त इस्कॉन रावेत मंदिरामध्ये विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – भगवद्‌गीता जयंतीनिमित्त रावेत येथील इस्कॉन मंदिरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे. गीता वाचनाच्या उपक्रमात हजार भक्तांनी सहभाग घेतला. भगवद्गीतेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या भक्तांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

भगवद्‌गीता एक मानव समाजासाठी अत्यंत आवश्यक असा ग्रंथ आहे. जो भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला सांगितलेला होता. भगवद्‌गीता जयंतीनिमित्त इस्कॉन मंदिरामध्ये गीता वाचनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजार भक्तांनी भाग घेतलेला होता. त्याचबरोबर प्रत्येक तीन मध्यानंतर एक छोटी परीक्षा भगवद्गीतेवर ठेवण्यात आली होती. अशा एकूण भगवद्गीतेवरती सहा परीक्षा घेण्यात आल्या.

यामध्ये लहान मुले, तरुण मुले, तरुणी, विवाहित लोक आणि वृद्ध या सर्वांनी सहभाग घेतला होता. भगवद्गीतेच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या भक्तांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

तसेच गीता जयंतीनिमित्त भगवद्गीता रथाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भगवद्गीतेची पूजा आणि आरती करून हा रथ पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांमध्ये फिरवण्यात आला. त्याचबरोबर या रथा समवेत सवलतीच्या दरामध्ये भगवद्गीतेचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3