Soham Public Library : सोहम सार्वजनिक ग्रंथालयातर्फे तीन दिवस विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमीत्त पिंपरी-चिंचवड येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयात (Soham Public Library) तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हे उपक्रम पार पडले.

पहिल्या दिवशी सहायक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांना त्यांनी आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन केले चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चितपणे मिळते असे त्यांनी विशद केले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी योगेश बहल माजी महापौर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले.

स्वातंत्र्य दिनी अमृत महोत्सवी वर्षाचा ध्वजारोहण आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी सोहम सार्वजनिक ग्रंथालय पिंपरी-चिंचवडमधील आदर्श ग्रंथालय असून सोहम ग्रंथालयातील अभ्यासिकेतून विद्यार्थी घडवण्याचे मोलाचे कार्य होत आहे. याप्रसंगी पिंपरी चिंचवडमधील मयुरी देशमुख यांना पहिली महिला ऑफ शोअर फ्लाईंग कॅप्टन होण्याचा बहूमान मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मयुरी देशमुख हिने देशातील पहिली महिला ऑफ शोअर फ्लाईंग कॅप्टन होण्याचा बहुमान मिळविला आहे.

Thergaon News : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रायफल, पिस्तुल नेमबाजी केंद्र सुरु

मयुरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला ती म्हणाली की, ऑफ शोअर पायलट क्षेत्रात युवतींना करिअरच्या मोठ्या संधी आहेत, मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने या क्षेत्रात तरुणींचे प्रमाण कमी आहे. देशात प्रशिक्षण केंद्र उभारल्यास अनेक तरुणींना या क्षेत्रातील करिअरच्या संधी खुणावतील. यावेळी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (Soham Public Library) विजेती आकांक्षा पिंगळे हिचा ही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले. तर, नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले. तर, आभार प्रदीप बोरसे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.