Talegaon Dabhade : आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन,टेल्को काॅलनी येथील आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सोमवारी (दि 26) आई तुळजाभवानीचा महाअभिषेक सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता तळेगाव स्टेशन चौक ते आई तुळजाभवानी मंदिरापर्यंत ढोल- पथकाद्वारे वाजतगाजत देवीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी दिली.

महिला सांघिक स्तोत्र पठण स्पर्धेत ‘राम तांडव’ स्तोत्र प्रथम

नवरात्रोत्सवात (घटस्थापना ते विजयादशमी) रोज सकाळी 11ते 12  महिलांचे श्रीसूक्त वाचन, सायं 7 वा.

महाआरती, नंतर महिलांचा भोंडला कार्यक्रम,होमहवन तसेच धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन व विनंती आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे.

दररोज सायं सात वाजता महाआरतीसाठी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

सोमवार दि 26 सप्टेंबर

गणेश खांडगे (अध्यक्ष, मा.ता.रा.काँ.) व गणेश काकडे (अध्यक्ष,तळेगाव शहर रा. काँ)

मंगळवार 27 सप्टेंबर

ॲड्. रविंद्रनाथ दाभाडे (माजी नगराध्यक्ष, त. दा.), गिरीश खेर (मा.उपनगराध्यक्ष, त.दा.न.प.)

बुधवार 28 सप्टेंबर

संजय उर्फ बाळा भेगडे (मा.राज्यमंत्री, म.रा.), संग्राम काकडे (माजी उपनगराध्यक्ष, त.दा.न.प.)

गुरुवार 29 सप्टेंबर

स्वप्नील नवले (उद्योजक),संतोष एकनाथ शेळके (माजी अध्यक्ष, रो.क्लब तळेगाव सिटी)

शुक्रवार 30 सप्टेंबर

सुनील शेळके (आमदार, मावळ) व विलास काळोखे (संस्थापक अध्यक्ष, रो.क्लब तळेगाव सिटी )

शनिवार 1 ऑक्टोबर

दिगंबर भेगडे (माजी आमदार, मावळ), स्वाती दाभाडे (शिंदे) (उपजिल्हाधिकारी, परभणी) व सुशांत शिंदे (उपजिल्हाधिकारी)

रविवार 2 ऑक्टोबर

डॉ. वैशाली यशवंत वाघमारे (तहसिलदार, खेड) व प्रभाताई बळवंत पडवळ (आदर्श माता)

सोमवार 3 ऑक्टोबर

अनिल आगळे (उद्योजक) व प्रभाकर तुमकर (पत्रकार)

मंगळवार 4 ऑक्टोबर

डॉ. राजेंद्र देशमुख (अथर्व हॉस्पिटल) व डॉ. अजित माने (अथर्व हॉस्पिटल)

बुधवार 5 ऑक्टोबर

भगवान शिंदे सर (शिक्षक नेते, माजी मुख्याध्यापक )

रविवार (दि 9) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सकाळी 7 ते 9 वा. या वेळेत देवीचा महाअभिषेक संपन्न होणार असून दुपारी 12 वा महाआरती होईल. त्यानंतर प्रतिष्ठानकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती देखील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.