Talegaon Dabhade News : प्रभाग क्रमांक 3 मध्ये गुरुवारी विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीत उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे येत्या (गुरूवारी) लोकार्पण करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी दिली. गुरूवारी सायंकाळी पाच वाजता हे कार्यक्रम होणार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सिमको काॅलनीतील सिद्धिविनायक नेस्ट सोसायटी समोर उद्यानाचे भूमीपूजन, सत्यकमल कॉलनीत ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी तर वनश्री नगर येथील श्रीरंग कला निकेतन येथे लहान मुलांसाठी खेळणीचे लोकार्पण माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे यांच्या हस्ते होणार आहे. गणेश काकडे यांच्या पाठपुराव्याने ही सर्व कामे होत आहेत.

याप्रसंगी नगरसेवक गणेश खांडगे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, नगरसेवक संग्राम काकडे, नगरसेवक रोहित लांघे, माजी नगरसेवक रविंद्र आवारे, नगरसेविका अनिता पवार, माजी नगरसेवक सुनिल कारंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.