Akurdi : त्वष्टा कासार समाज संस्थेच्या वतीने तुळजा भवानी माता मंदिरात मंगळवारी विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज –  त्वष्टा कासार समाज संस्था, पिंपरी-चिंचवड-मावळ विभागाच्या वतीने श्री देवी महाकालीच्या वाढदिवसानिमित्त उद्या (मंगळवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.  आकुर्डी येथील तुळजाभवानी माता मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमात भगवद्गीता पठण, ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दुपारी २.३० वाजल्यापासून सुरू होऊन धनंजय काळभोर यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता देवीची आरती करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर पिंपळे, अन्य पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.