Chinchwad News : बालदिनानिमित्त सायन्सपार्कमध्ये रविवारी विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि टायनीबाँटस यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (रविवारी) बालदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस 14 नोव्हेंबर हा ‘बाल दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त उद्या सायन्सपार्कमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ‘अंतराळ विज्ञानातील उगवता तारा’ यावर शोध निबंधाचे सादरीकरण होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 रोबोटिक्स प्रात्याक्षिक व प्रदर्शन, दुपारी 2 ते 3 या वेळेत गमतीशीर विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 4 या वेळेत खुली विज्ञान प्रश्न मंजुषा तर सायंकाळी 6 ते 7.30 या वेळेत आकाश दर्शन – गुरु, शनि, शुक्र ग्रह अत्याधूनिक दुर्बिणीतून पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. त्यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 9552994294, 7744944333 या मोबाईलनंबरवर किंवा [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधावा. संकेत तुपे यांच्या विशेष सहकार्याने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.