Wadgaon Maval : घरातील स्त्रीमध्येच देवीची विविध रुपे – मेधा कुलकर्णी

0

एमपीसी न्युज : “घरातील स्त्री हीच देवीची विविध रुपे असून ती जन्मदाती आदिशक्ती असते, घरातील कामे करताना ती अष्टभुजा रुपात असते, स्वयंपाक करताना ती अन्नपूर्णा असते, लहानग्यांचा अभ्यास घेताना ती सरस्वती होते, घरखर्चाचे नियोजन करताना ती महालक्ष्मी असते, घरावर बाका प्रसंग आल्यास ती दुर्गा होऊन लढते तर घराकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यास ती कालिमाता बनून प्रत्युत्तर देते.घरातील सर्वांसाठी अनेक भूमिका निभावणारी ती एकमेव असते म्हणून तीचा सन्मान केला जावा हाच खरा स्त्री शक्तीचा जागर आहे.” असे विचार सरस्वती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे यंदा विसावे वर्ष आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीने यु-ट्यूब, फेसबुक लाईव्ह याद्वारे चालू आहे. ग्राहक पंचायतीच्या महाराष्ट्र राज्य सहसंघटक सौ.मेधा कुलकर्णी यांनी उस्मानाबाद येथून व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, संस्थापक कार्याध्यक्ष  डॉ.रवींद्र आचार्य, सरस्वती व्याख्यानमालेचे अध्यक्ष दिपक भालेराव, कार्याध्यक्ष अश्विनी बवरे, कार्यक्रम प्रमुख संगीता ढोरे, सचिव अमोल ठोंबरे , खजिनदार योगेश म्हाळसकर, महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायत चे सचिव अरुण वाघमारे, वडगाव वि.का.सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब म्हाळसकर,संचालक गोपाळ भिलारे, नंदकुमार दंडेल यांच्यासह मावळ विचार मंचाचे पदाधिकारी ,महिला संयोजन समिती, संचालक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

वैशाली ढोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अध्यक्ष दिपक भालेराव यांनी स्वागत  केले, पाहुण्यांची ओळख कांचन ढमाले यांनी करून दिली तर प्रास्ताविक डॉ.रविंद्र आचार्य यांनी केले. माधवी बोरावके यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.