Pimpri : पुरंदरला छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम 

एमपीसी न्यूज  – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुरंदरला मंगळवार दि. १४ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. शहीद शूर सैनिकवीरांना श्रद्धांजलीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड असणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता राजेंद्र कांबळे यांचा शाहीरी जलसा, सकाळी दहा वाजता शिवकालीन नाणी व शस्त्रांचे प्रदर्शन पालखी मिरवणूक, साडेदहा वाजता शिवव्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान, सकाळी अकरा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.

यावेळी पत्रकार तुळशीदास भोईटे, कादंबरीकार सुशील धसकटे, अभिनेते भरत जाधव यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यावेळी सिने अभिनेते सयाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पंचायत समिती सभापती पूरंदर अर्चना जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अभयसिंह खास सावंत, प्रदेश समन्वयक शांताराम कुंजीर, राष्ट्रसेवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष राहूल पोकळे आदी उपस्थित राहणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक स्नेहल काकडे, स्वप्नील काकडे, स्वप्निल गायकवाड, दशरथ यादव यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती  संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाअध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.