PCMC : महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) “शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय हॉस्पिटलचेउदघाटन उद्या (रविवारी)  महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत  पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

प्रभाग क्र. 9 (जुना प्रभाग क्र. 28) मासुळकर कॉलनी, पिंपरी (आरक्षण क्र. 85) “नागरी आरोग्य केंद्र व नेत्र रुग्णालय” या ठिकाणी सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यानंतर 10.30 वाजता भोसरी गवळीमाथा येथील कचरा हस्तांतरण केद्राचे उद्घाटन तर सकाळी 10.50 वाजता कासारवाडी येथील कचरा हस्तांतरण केद्राचे उद्घाटन होणार असून आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास  खासदार,आमदार आदी उपस्थित राहणार आहेत.

 

Khed : खेड तालुका जुनी पेन्शन आंदोलन समन्वय कृती समितीचा आंदोलन तीव्र करण्याचा शासनाला इशारा

शंकरराव मासुळकर आय हॉस्पिटल हे पदव्युत्तर संस्था, वायसीएम रुग्णालयाशी संलग्नित राहणार असल्यामुळे एम एस- ऑपथालमोलॉजी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून (PCMC) देखील उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम, कौशल्य प्रयोगशाळा, संशोधन केंद्र इ. करिता या रुग्णालयाचा वापर होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.