Chinchwad News: शिवतेजनगर येथे दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबरपासून श्री गुरुचरित्राचे पारायण सुरु झाले असून 6 डिसेंबरपर्यंत पारायण असेल. तर, 7 डिसेंबर रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात 7 डिसेंबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 7 ते 9 या वेळेत श्रींचा अभिषेक, होमहवन, आरती, सकाळी 9.30 ते 11 या वेळेत श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ शिवतेजनगर यांचा भजनाचा कार्यक्रम, 11.30 ते दुपारी 1 या वेळेत सिद्धीविनायक महिला भजनी मंडळ संभाजीनगर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 1.30 ते 3 या वेळेत अष्टविनायक महिला भजनी मंडळ यमुनानगर यांचा तर दुपारी 3.30 ते 5 या वेळेत सिद्धेश्वर भजनी मंडळ शिवतेजनगर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.

PCMC: अतिरिक्त आयुक्तपदाचा वाद चिघळला; जांभळेंची तक्रार अन् झगडे यांना नोटीस

सायंकाळी 5 ते 7 या वेळेत महादेव महाराज भुजबळ यांचे प्रवचन, श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होईल. 7.15 ते 10 या वेळेत भक्तिरंग-भक्ति व भावगीतांचा कार्यक्रम होईल. अविनाश पाठक, शर्मिला शिंदे, आशुतोष सुटजूसे यांचा सहभाग असेल. सुनंदा सुपनेकर निवेदन करतील. निलेश शिंदे, आशिष झाडे, अनिरुद्ध देवगांवरक वादनाची साथसंगत करतील. दरम्यान याचवेळी महाआरती व महाप्रसाद होईल. शाहूनगर, संभाजीनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.