Pune : काळभैरवनाथ जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज – वानवडीचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त  विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी सोपानराव गवळी, शाम जांभुळकर, रघुनाथ खोपकर, डोंगरे महाराज, साहिल खोपकर, सुरेश होले, नितीन गवळी, सुभाष जांभुळकर, शिवराम जांभुळकर, सतीश गवळी, प्रितेश गवळी, सुभाष धाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये स्थापित देवतांचे पूजन, भैरवरूद्र पाठ, हवन, उत्तरपूजन व पूर्णाहुती, महापूजा, लघुरुद्र, दही दुधाचा अभिषेक, आरती व
जन्मसोहळा जगन्नाथ खोपकर व शोभा खोपकर यांच्याहस्ते संपन्न झाला. त्यानंतर वानवडी गाव भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर भाविकांनी भंडाराचा लाभ घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1