Salumbre News : प्रसिद्ध उद्योजक निलेश राक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम 

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध उद्योजक निलेश राजाराम राक्षे यांचा मंगळवारी (दि.20) वाढदिवस साजरा होत आहे. निलेश राक्षे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

समस्त ग्रामस्थ साळुंब्रे, भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री. भैरवनाथ महाराज युवा ग्रुप, निलेश राजाराम राक्षे मित्र परिवार यांनी निलेश राक्षे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 मंगळवारी होणा-या कार्यक्रमाची रुपरेषा

सकाळी 6 वा – श्री. भैरवनाथ महाराज व विठ्ठल रुक्मिणी महा अभिषेक

सकाळी 7 वा – आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप

सकाळी 8 वा – ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

सकाळी 9 वा – कोरोना योध्दा सत्कार समारंभ

सकाळी 10 वा – वृक्षारोपण

सकाळी 11 वा – अनाथ आश्रममध्ये फळे वाटप

 

‘प्रिय नागरिक, कार्यकर्ते, आणि मित्र परिवार आपणास नम्र विनंती आहे की, तुम्ही सर्वजण कोरोना पासून स्वतःची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. कुठलाही इतर खर्च न करता द्यायचेच असेल तर सॅनिटायझर, मास्क, सफाई कामगारांना मदत, अनाथ आश्रमातील मुलांसाठी मदत, कोरोना रुग्णांसाठी शालेय साहित्य, आपल्या गावातील गरजुंना वाटप करावे,’ असे आवाहन निलेश राक्षे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.