ढगांच्या दुलईखाली, निसर्गाच्या कुशीत…

एमपीसी न्यूज- स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध हवा, बगिचे आणि रस्त्यांच्या दुतफो हिरवीगार झाडी असं चित्र खेडेगावात किवा मग एखाद्या थंड हवेच्या ठिकाणीच पाहायला मिळतं. शहरात ही दृश्य तशी दुर्मिळच. म्हणजे बघा की सकाळच्या कोवळ्या उन्हात फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध आहे, जवळच एखादी आमराई आहे, स्वच्छ प्रशस्त मोकळे रस्ते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूचा परिसर हा जैवविविधतेने संपन्न आहे अशी जागा शहरात सापडणं कठीण. सगळीकडे नजरेस पडतं ते सिमेंटचे जंगल आणि गाड्यांची गर्दी. मग वर म्हटल्याप्रमाणे स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणारा, शुद्ध हवा देणारा, बगिच्यांनी हिरवागार झालेला असा स्वप्नवत वाटणारा परिसर पाहायला मिळणार तरी कुठे? या प्रश्‍नाचं उत्तर म्हणजे ‘वारीवन’ हा प्रकल्प ! 

शहराशी जोडलेला पण तरीही शहरातील गर्दी, अपुरे रस्ते, कोंदटपणा आणि सगळ्यात त्रासदायक म्हणजे ट्रफिकच्या कटकटीपासून दूर असा परिसर पुण्याजवळील उरसे सेंट्रल इथे आकारास येत आहे. म्हणजेच शहरात राहूनही आता निसर्गसंपन्न आणि समृद्ध जीवनशैल्री अनुभवता येणार आहे. उरसे सेंट्रल परिसरात सुमारे अडीचशे एकर जागेवर ‘वारीवन’ हा पुण्यातील सगळ्यात मोठा व्हिला प्रकल्प आकाराला येणार आहे. आधुनिकता आणि नैसर्गिक सौंदर्य यांची सांगड घालून हा प्रकल्प उभा केला जाणार असल्याने एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जी वैशिष्ट्यपूर्ण नगररचना आपल्याला आढळते ती याठिकाणी अनुभवता येणार आहे. शहराशी जोडलेला असा हा परिसर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे इतर गृहनिर्माण प्रकल्पांपेक्षा वेगळा असणार आहे हे नक्की. शहरातील गर्दी नकोशी झाली की आपण सेकंड होमचा पर्याय शोधू लागतो. रोजची दगदग-धावपळ याचा कंटाळा आला की चार दिवस जरा शांत ठिकाणी, निसर्गरम्य वातावरणात जावंस वाटतं. म्हणून मग आपण एखादं थंड हवेचं ठिकाण निवडतो आणि तिकडे जातो. परंतु आजकाल तिथेही एवढी गर्दी पाहायला मिळते की उगाच आपण इकडे आलो असं वाटू लागतं. लोकांची गर्दी आणि ट्रॅफिक जाममुळे होणारी चीडचीड सगळ्यांचा मूड ऑफ करते.’कुठे मिळेल शांत, निसर्गरम्य व सुनियोजित जीवनशैल्री’ हा प्रश्‍न सतावू लागतो.या तुमच्या प्रश्‍नाचं उत्तर सापडलं आहे ते ‘वारीवन’च्या रूपाने. कारण हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नाही तर एक शांत, सुव्यवस्थित आणि सुनियोजित जीवनशैली इथे असणार आहे. आधुनिक सोयी-सुविधा देण्याबरोबरच निसर्गरम्य शांत वातावरणात मोकळा श्वास घेण्याची संधी या परिसरात मिळेल. उरसे टोलनाक्‍्यापासून जवळच हा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पात 4 बीएचके आणि 3 बीएचके विला असणार आहेत. तळमजला आणि पहिला मजला असे हे टुमदार बंगले तुमचं हक्काचं विश्रांतीचं ‘सेकंड होम’ ठरू शकतात. हा परिसर शहराशी इतक्या चांगल्या पद्धतीने जोडला जाणार आहे की सेकंड होम किवा विकेंड होमच कशाला, याकडे तुम्ही तुमचं भविष्यातील ‘फर्स्ट होम’ म्हणूनही खुशाल पाहू शकता. याचं कारण म्हणजे इथून उरसे टोल नाका अगदी जवळ आहे, हिंजवाडी अवघ्या वीस मिनिटांवर आहे आणि पुणे मेट्रो सुरू झाल्यावर तर हे मोक्याचं ठिकाण असणार आहे. म्हणूनच ‘फर्स्ट होम’ म्हणूनही आपण या प्रकल्पाकडे पाहू शकतो.

पुढील दहा वर्षांत पुणे आणि आसपासच्या परिसराचा एवढा झपाट्याने विकास होणार आहे की त्यावेळी या परिसराला खूप डिमांड असेल. भविष्यातील ही गरज ओळखूनच ‘वारीवन* प्रकल्प आखण्यात आला आहे असं दिसतंय. बरं, इथे काय नाही ते विचारा. म्हणजे ह्या प्रकल्पात क्लब हाउस, गोल्फ कोर्स, पोलिस स्टेशन, अग्निशमन दल, फार्मसीज आणि इतर सर्व प्रकारची दुकानं असणार आहेत, जेणेकरून त्यासाठी लांब तंगडतोड करत जायची गरज भासणार नाही. आजकाल शहरांचा विकास होताना जी गोष्ट हरवत चालली आहे ती म्हणजे खेळण्याची मैदाने आणि वृक्षवल्ली. परंतु ‘वारीवन’ मध्ये याच गोष्टींना त्यांचं हक्काचं स्थान देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत दहा हजार पेक्षा अधिक झाडे लावण्यात येणार असून जवळपास सत्तर टक्के परिसर मोकळा किवा ‘ग्रीन झोन’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय जगप्रसिद्ध ‘वेस्टन घाट’चा हा परिसर असल्याने पावसाळ्यात त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसणार यात शंकाच नाही, पण ते खुलून दिसावं यासाठी तिथला निसर्ग, कायम राखला जाणं आवश्यक आहे हे ओळखून ‘वारीवन’ प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे परिसर विकसित झाल्यानंतरही इथला निसर्ग अबाधित राहणार आहे. दर पाच मिनिटांवर मोकळी जागा किवा हिरवागार बगिचा नजरेस पडणार आहे.

सकाळचं प्रसन्न वातावरण इथे अनुभवास येईल. आजूबाजूला हिरवा निसर्ग असेल, सोबतीला शुद्ध हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश आणि चारही बाजूने वाहणारे गार वारे असतील तर संध्याकाळी घरी येणाऱ्या माणसाच्या मनावरचा शीण दूर होऊन मन प्रसन्न होणार हे नक्की. ‘वारीवन’चा परिसर हा खंडाळ्यापेक्षा उंचीवर असून निसर्गसंपन्नतेने नटलेला आहे. तुम्ही पुण्यात रहात असाल तर सेकंड होमची सगळी वैशिष्ट्य या ठिकाणी ‘फर्स्ट होम’ च्या रूपाने तुम्ही अनुभवू शकता, यापेक्षा अजून काय हवं, नाही का !

अधिक माहितीसाठी संपर्क
टोल फ्री नंबर 18001037237

मुकुंद एकविरे

91 95610 59319

लोकेशन मॅप लिंक

https://goo.gl/maps/7JL5kG3yRXBMLQ4x8

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.