Alandi : पालखी सोहळ्या निमित्त अलंकापुरीमध्ये वारकरी भाविकांची येण्यास सुरुवात

एमपीसी न्यूज – आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्त आळंदीमध्ये (Alandi) वारकरी भाविकांची येण्यास सुरुवात झाली आहे. काही धर्मशाळेत वारकरी भाविक आले आहेत.

Talegaon Dabhade : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी एक हजार शौचालयांची व्यवस्था

महिला भाविक तेथील वारकरी भाविकांसाठी स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. काही  ग्रंथ वाचण्यात  दंग दिसून येत आहेत तर काही गप्पा गोष्टीत दंग आहेत. काही भाविक विश्रांती घेताना दिसून येत आहेत.

सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहे, सिध्दबेट ही भूमी संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत सोपान व संत मुक्ताई यांची वास्तव भूमी, कर्मभूमी आहे. तिच्या दर्शनासाठी भाविक येतात. प्रदक्षिणा रस्त्यावरील अखिल मंडई मंडळ (माऊलींच्या भिंती शेजारील) धर्मशाळेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताई ने मांडे भाजलेले मूर्ती  आहे. तिच्या दर्शनासाठी ही भाविक येत आहेत. तसेच, आळंदी मधील तुळशी, हार , फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग,वीणा, टाळ, पेटी ग्रंथ साहित्य इ.विविध दुकाने सजलेली दिसून येत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.