Pimpri : वरूणराजाचे सीमोल्लंघन; शहरात पावसाची दमदार हजेरी

एमपीसी न्यूज – पावसाळा संपण्यागोदरच दडी मारलेल्या पावसाने आज (गुरुवारी) विजया दशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवड आणि पुणेकर दसऱ्यानिमित्त एकमेकांना सोने वाटण्यात दंग असताना पावसाने सीमोल्लंघन करत दमदार हजेरी लावली.
पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासून 31.9 अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले. उन्हाच्या झळा नसल्या तरी काही प्रमाणात दिवसभर उकाडा जाणवला. सायंकाळी अचानक ढग दाटून आले आणि सातच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाळा संपण्यापूर्वीच संपलेला पाऊस पावसाळा संपल्यानंतर अचानक आल्याने शहरवासीयांना आनंदाचा धक्का बसला. अचानक आलेल्या पावसामुळे पथारीवाल्यांची चांगलीच धावपळ झाली.

मावळ परिसरात परतीचा पाऊस न पडल्याने भात पिकांनी माना टाकल्या असून पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मावळातील आणि एकूणच राज्यभरातील शेतकरी पावसासाठी आसुसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. वरूणराजाने विजया दशमी दस-या निमित्त सीमोल्लंघन करून बळीराजाला उभारीचा उपहार दिला आहे. अचानक आलेला पासून आता किती पडणार, याबाबत काहीही माहिती नसली तरी तात्पुरता आनंद मात्र सर्वांना झाला आहे.
शहरात रावण दाहनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. खुल्या परिसरात रावण दहन होत असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे हा रावण दहनाचा कार्यक्रम अनेक मंडळांना रद्द करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.