BNR-HDR-TOP-Mobile

Varvand/Pune : महाजानदेश यात्रा पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण दौऱ्याची केली पाहणी

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजानदेश यात्रा तिसऱ्या टप्यात पश्चिम महाराष्ट्र येणार आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे हे महाजानदेश यात्रा पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख असून आज महाजनादेश यात्रेची पूर्व तयारी आढावा म्हणून वरवंड (बाजारतळ) येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मैदानाची तसेच कार्यक्रमाच्या तयारीची आज पाहणी केली. तसेच काष्टी, दौंड,इंदापूर, बारामती या ठिकाणी होणाऱ्या स्वागत सभा, जाहीर सभेच्या ठिकाणी जाऊन या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना महाजानदेश यात्रेसंदर्भात माहिती दिली.

यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले कि राज्यातील पाच वर्षांच्या राज्य शासनाच्या पाच वर्षांचा लेखा जोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजानदेश यात्रा काढली आहे आपल्या सरकारने पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आपल्यायाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू, असा विश्वास नामदार बाळा भेगडे यांनी यावेळी व्यक्त यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पुणे जिल्हा ज्येष्ठनेते वासुदेव काळे,नामदेव बाप्पू ताकवणे, बाळासाहेब काळोखे, दिवेकरर, अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिव (आण्णा) पाचपुते, युवानेते विक्रमसिंह (दादा) पाचपुते, रासपचे माजी प्रदेशध्यक्ष बाळासाहेब नाहाटा,  अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like